Join us

वर्तकनगर उड्डाणपूल मंजूर!

By admin | Updated: July 7, 2014 00:53 IST

मागील १० वर्षे सर्वाधिक वाहतूककोंडीने जर्जर झालेल्या वर्तकनगर झोनला आता खरोखरच अच्छे दिन बघायला मिळणार आहेत.

ठाणे : मागील १० वर्षे सर्वाधिक वाहतूककोंडीने जर्जर झालेल्या वर्तकनगर झोनला आता खरोखरच अच्छे दिन बघायला मिळणार आहेत. अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या कॅडबरी-शिवाईनगर उड्डाणपुलाला अखेर ठामपा आयुक्त असीम गुप्ता यांनी मंजुरी दिली आहे. कॅडबरी ते शिवाईनगर हा साधारण ३ किमीचा टप्पा असून त्याचे सर्वेक्षणही झाले आहे. दोन्ही बाजूंनी फार कमी प्रमाणात लोक विस्थापित होतील, याची दक्षता घेतलेला ले-आऊटही तयार झाला असून १२० कोटी रुपयांचा खर्च असलेले टेंडरही लवकरच निघणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)