मुंबई : राज्यातील सर्व वीज ग्राहकांना वीज उपलब्ध असतानाही बहुतांश भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांना तोंड द्यावे लागत आहे. वीज खंडित होण्याने महावितरणचे वार्षिक ५,२०० कोटी रुपयांचे तर ग्राहक, उद्योग आणि शेतीचे महावितरणच्या चौपट नुकसान होत आहे, असा दावा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला.वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहक, उद्योजक आणि शेतकरी त्रस्त झाले असून, नुकतेच वीज नियामक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत महावितरणने हे प्रकार स्थानिक कारणांमुळे होत असल्याचे म्हटले आहे. दररोज दोन तास अथवा अधिक वेळ हा प्रकार घडतो. असेही त्यांनी सांगितले.मागील १७ वर्षांत ५० हजार कोटींहून अधिक रक्कम पायाभूत सुविधांसाठी खर्च झाली असतानाही स्थानिक पातळीवर वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण तीन ते चार वर्षांत दुप्पट झाले आहे. हे टाळण्यासाठी आयोगाने तांत्रिकदृष्ट्या सक्षम तज्ज्ञांची समिती नेमावी, नुकसान थांबवावे, अशी मागणी संघटनेने आयोगाकडे केली आहे.
‘खंडित विजेमुळे कोटींचे नुकसान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 05:41 IST