मुंबई : मूल्यवर्धित करातून बेस्ट उपक्रमास सध्यातरी मूल्यविर्धत करातून सूट देता येणार नाही. मात्र त्याबाबत खास बैठक घेऊन विचार करण्यात यईल, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले.मुनगंटीवार म्हणाले की, मूल्यविर्धत करातून विशिष्ट उपक्र मास सूट देण्याचे शासनाचे धोरण नाही. बेस्ट उपक्र माप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेसुद्धा करसवलतीची मागणी केली होती. त्यांची मागणी मान्य केल्यास इतर परिवहन मंडळांकडूनही करसवलतीची मागणी होऊ शकते. त्यामुळे शासनाच्या महसुलात तोटा निर्माण होऊ शकतो. परिणामी ही मागणी मान्य होऊ शकत नाही. मात्र सभासदांचा आग्रह असेल तर त्याबाबत विशेष बैठक घेऊन विचार करण्यात येईल, असे मुनगंटीवार म्हणाले. बेस्टचा परिवहन उपक्र म सद्यÞस्थितीत तोट्यात असून डिझेल, सीएनजी इंधनखरेदीवरील मूल्यविर्धत करापोटी बेस्टला दरवर्षी ६६ कोटींचा भार सहन करावा लागतो. (विशेष प्रतिनिधी)बेस्टला ७०० कोटी रु पयांचा तोटा असून २००८ ते १५ या काळात ८वेळा भाडेवाढ करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांत ३० लाखांची घट झाली आहे. इतर राज्ये परिवहन विभागाला सवलत देतात. महाराष्ट्र शासनानेही तशी सवलत द्यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली होती. भाजपाचे अतुल भातखळकर यांनी एसटीप्रमाणेच बेस्टला टोलमाफी मिळावी, अशी मागणी केली.
मूल्यवर्धित करातून बेस्टला सूट नाही
By admin | Updated: August 1, 2015 01:26 IST