Join us

व्हेलेंटाईन डे ला शासकीय बुट्टी

By admin | Updated: February 10, 2015 22:32 IST

वर्षभर प्लॅनिंग करून १४ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर विवाह किंवा विवाह नोंदणी करणाऱ्या इच्छुकांची यंदा चांगलीच निराशा झाली आहे,

स्रेहा पावसकर, ठाणेवर्षभर प्लॅनिंग करून १४ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर विवाह किंवा विवाह नोंदणी करणाऱ्या इच्छुकांची यंदा चांगलीच निराशा झाली आहे, कारण हा दिवस सेकंड सॅटरडे असल्याने नोंदणी पद्धतीने विवाह करणे अथवा त्या दिवशी विवाहाची नोंदणी करणे शक्यच होणार नाही.फेब्रुवारी सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते व्हेलेंटाईन डे चे. काही जणांचे याच मुहूर्तावर विवाहाचे प्लॅनिंग असतात आणि मग पंचांगानुसार मुहूर्त नसला तरी दुय्यम निबंधक कार्यालयात अनेक जण विवाह किंवा विवाह नोंदणी करतात. यंदा पंचागानुसार तर त्या दिवशी मुहूर्त नाहीच, परंतु सेकंड सॅटरडे असल्यामुळे कार्यालयालाही सुट्टी आहे. त्यामुळे त्या दिवशी इच्छुकांना विवाहसंदर्भातील कोणतीही प्रक्रिया करता येणार नसल्याने यासंदर्भात व्हेलेंटाईन डे ने जणू काही बुट्टीच मारली आहे. तर अद्याप १३ फेब्रुवारीकरिता १३ युगुलांनी तर १६ फेब्रुवारीकरिता १२ युगुलांनी विवाह करण्यासाठीची नोंदणी केली आहे,अशी माहिती प्रभारी विवाह अधिकारी बी.एस.जाधव यांनी दिली.