Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाशीत मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा

By admin | Updated: June 5, 2016 03:26 IST

जन्मदिनाच्या पार्टीचे बिल भरण्यावरून झालेल्या वादातून मद्यधुंद तरुणींच्या दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना वाशीत घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या प्रकारात मद्यधुंद

नवी मुंबई : जन्मदिनाच्या पार्टीचे बिल भरण्यावरून झालेल्या वादातून मद्यधुंद तरुणींच्या दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना वाशीत घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या प्रकारात मद्यधुंद तरुणींनी महिला पोलिसांनादेखील मारहाण केली. यानुसार पाच तरुणी व त्यांचा एक मित्र अशा सहा जणांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे.वाशीतील इनॉर्बिट मॉलच्या बेसमेंटमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्या ठिकाणी काही तरुणींमध्ये भांडण सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सदर प्रकार उघडकीस आला. खारघरमधील एक तरुणी मित्र व मैत्रिणीसोबत मॉलमधील पबमध्ये जन्मदिनाची पार्टी साजरी करण्यासाठी आली होती. त्या ठिकाणी या सर्वांनी मद्यपान केल्यानंतर रात्री १ च्या सुमारास त्याच ठिकाणी असलेल्या दुसऱ्या ग्रुपमधील एका मुलीने तिला टोमणा मारला. यावरुन दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. याच वादातून मॉलच्या बेसमेंटमध्ये त्यांच्यात हाणामारी झाली. अखेर काही प्रत्यक्षदर्शींनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या सर्व मुली मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात बसवून त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. याचा राग आल्यामुळे सदर तरुणींनी पोलीस ठाण्यातच महिला पोलिसांना मारहाण केली. या प्रकारात तीन महिला पोलीस किरकोळ जखमी झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)