Join us
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलमध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST

मुंबई महापालिका : पोलीस दल, अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनाही देणार लसलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई पालिका १४ फेब्रुवारीपर्यंत लसीकरणाचा ...

मुंबई महापालिका : पोलीस दल, अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनाही देणार लसलोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई पालिका १४ फेब्रुवारीपर्यंत लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करणार आहे. महानगरपालिकेच्या नियोजनाप्रमाणे लसीकरण सुरळीत झाल्यास एप्रिल महिन्यात शहर, उपनगरात ५० वर्षांहून अधिक वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्याचा निर्णय़ पालिका प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय, लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पोलीस दल, अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाच्या प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्याचा विचार महापालिका करीत असून त्याकरिता तेथील सेवा-सुविधांचा आढावा घेण्यात येत आहे. याविषयी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण करण्यात येईल. यात लसीचा अधिकचा साठा लवकरात लवकर मिळणेही महत्त्वाचे आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात अतिजोखमीचे आजार असणाऱ्या ५०पेक्षा अधिक वय असणाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. या वेळी दर दिवशीचे ५० हजार व्यक्तींचे लक्ष्य ठेवण्यात येणार आहे.

* दोन डोसमध्ये २८ दिवसांचा कालावधीलसीकरण प्रक्रियेबाबत अधिक माहिती देताना काकाणी यांनी सांगितले, कोवॅक्सिन वा कोविशिल्ड या दोन्ही लसी १८ वर्षांखालील मुला-मुलींना देण्यास सक्त मनाई आहे. सध्या शहर उपनगरात सुमारे १२ लसीकरण केंद्रे आहेत, लवकरच खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येतील. पहिल्या टप्प्याकरिता १ लाख २५ हजार कर्मचाऱ्यांना दोन लसीचे डोस देण्यात येणार असून, या दोन डोसच्या मध्ये २८ दिवसांचा कालावधी असेल. येत्या काही दिवसांत दहिसर, मुलुंड आणि भायखळा येथील रिचर्डसन केंद्रातही लसीकरण सुरू करण्यात येणार आहे....................................................