मुंबई : राज्यात शुक्रवारी २ लाख ६५ हजार ८६२ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यात २ लाख ३१ हजार ५१८ जणांना कोविशिल्ड, तर ३४,३४४ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत एकूण ५५ लाख ३१ हजार ३२४ जणांचे कोरोना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर मुंबईत आतापर्यंत एकूण १० लाख ४८ हजार ६९४ जणांना लस देण्यात आली. लसीकरणात मुंबई आघाडीवर आहे. त्याखालाेखाल पुणे ६ लाख ६० हजार २९१, तर ठाणे येथे ४ लाख २२ हजार ६२३ जणांनी लस घेतली. नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. नागपूरमध्ये ३ लाख ३३ हजार ३४५ जणांचे तर नाशिकमध्ये २ लाख ५४ हजार २५८ जणांचे लसीकरण करण्यात आले.
-----------------