Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २ कोटी सात लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:05 IST

मुंबई : राज्यात शनिवारी १ लाख २२ हजार १४० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे, तर आतापर्यंत राज्यात एकूण २ ...

मुंबई : राज्यात शनिवारी १ लाख २२ हजार १४० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे, तर आतापर्यंत राज्यात एकूण २ कोटी ७ लाख ५२ हजार ८७ लाभार्थ्यांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ११ लाख ५८ हजार १६७ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ७ लाख १९ हजार १३९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. १६ लाख ४६ हजार १५९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस, तर ७ लाख ४६ हजार ६५३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ७ लाख १८८ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी २८ लाख ५३ हजार ९६३ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर २९ लाख २७ हजार ८१८ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

राज्यात मुंबईत ३० लाख २८ हजार १५०, पुण्यात २६ लाख ४३ हजार ४९२, नागपूरमध्ये १२ लाख ५२ हजार ६३५, ठाण्यात १५ लाख ५८ हजार ३६६, नाशिकमध्ये ९ लाख ३३ हजार १७८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.