Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आतापर्यंत १ कोटीहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्राने कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये एक कोटीचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत राज्यात सुमारे १ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्राने कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये एक कोटीचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत राज्यात सुमारे १ कोटी ३८ हजारांहून अधिक जणांना लस देण्यात आली आहे.

कोरोना लसीकरणाबाबत महाराष्ट्र आघाडीवर असून, या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले. राज्यात १० एप्रिल रोजी दिवसभरात २ लाख ८२ हजार ९४४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. १ लाख ४४ हजार ४६७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला, तर ५ लाख ७ हजार ८३६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. ९ लाख ३७ हजार ९२८ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला, तर ३ लाख १२ हजार ५७६ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या ६९ लाख ९४ हजार ८२ जणांनी पहिला डोस तर १ लाख ३३ हजार ३५१ जणांनी दुसरा डोस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

........................