Join us

किमान तीन दिवस लसीकरण सुरळीत हाेण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:05 IST

लसीच्या १ लाख ५८ हजार मात्रा प्राप्त झाल्या असून, २६ ते २८ एप्रिल असे किमान तीन दिवस मुंबईतील लसीकरण ...

लसीच्या १ लाख ५८ हजार मात्रा प्राप्त झाल्या असून, २६ ते २८ एप्रिल असे किमान तीन दिवस मुंबईतील लसीकरण सुरळीत होण्यास मदत होणार आहे. ५९ लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात ७३ अशी एकूण १३२ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

रविवारी कोविशिल्ड लसीच्या १ लाख ५० हजार तर कोव्हॅक्सिन लसीच्या ८ हजार अशा एकूण १ लाख ५८ हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत. हा साठा महानगरपालिकेच्या कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस साठवण केंद्रात नेण्यात आला आहे.

मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी अशा सर्व लसीकरण केंद्रांना कांजूरमार्ग येथूनच, त्यांची सरासरी दैनंदिन आवश्यकता लक्षात घेऊन लस साठा वितरण सुरू करण्यात आले आहे.

साठा प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत त्याचे वितरण सुरू होते. ज्यांनी लस साठा रविवारी नेला नाही त्यांना सोमवारी सकाळी ८ वाजेपासून लस साठा नेता येईल. ही बाब लक्षात घेता, २६ एप्रिल रोजी काही केंद्रांवर लसीकरण प्रत्यक्ष उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.

..........................