Join us

राज्यात सात कोटी ८१ लाख लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:06 IST

मुंबई : आतापर्यंत राज्यात एकूण ७ कोटी ८१ लाख ३ हजार ४८ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली ...

मुंबई : आतापर्यंत राज्यात एकूण ७ कोटी ८१ लाख ३ हजार ४८ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे, तर शनिवारी ६ लाख ३६ हजार ९१६ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटांतील २ कोटी ८२ लाख १६ हजार ५५५ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ६१ लाख ४ हजार ९०१ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ३७ लाख ५९ हजार ६११ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ३७ लाख ९६ हजार ९७६ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात १२ लाख ९३ हजार ३९५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १० लाख ६६ हजार ९३४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख ४३ हजार ४०८ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १७ लाख २१ हजार २६८ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.