Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २ कोटी ६४ लाख लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:05 IST

मुंबई : राज्यात बुधवारी २ लाख ४७ हजार ६६३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे, तर आतापर्यंत २ कोटी ६४ ...

मुंबई : राज्यात बुधवारी २ लाख ४७ हजार ६६३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे, तर आतापर्यंत २ कोटी ६४ लाख ७९ हजार ८२८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटांतील २५ लाख ९७ हजार ६५८ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस २ लाख ३ हजार ४५९ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

राज्यात १२ लाख ३२ हजार ९०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला, तर ७ लाख ९७ हजार २०१ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. १९ लाख ९७ हजार ६२५ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला, तर ८ लाख ३८ हजार ४३५ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.

राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ५३ लाख ७० हजार ३५० लाभार्थ्यांना पहिला, तर ३४ लाख ४२ हजार २०० जणांना दुसरा डोस देण्यात आला. मुंबईत ४३ लाख ५० हजार २४२ लाभार्थ्यांना, पुण्यात ३४ लाख ९१ हजार ९४ लाभार्थ्यांना ठाण्यात २० लाख ३५ हजार ३३९ लाभार्थ्यांना आणि नागपूरमध्ये १३ लाख ६७ हजार ४२३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

...................................