Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात साडेसात कोटींहून अधिक जणांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:06 IST

मुंबई : राज्यात बुधवारी ७ लाख २८ हजार २०६ लाभार्थ्यांचे लसीकरण कऱण्यात आले. तर आतापर्यंत राज्यात एकूण ७ कोटी ...

मुंबई : राज्यात बुधवारी ७ लाख २८ हजार २०६ लाभार्थ्यांचे लसीकरण कऱण्यात आले. तर आतापर्यंत राज्यात एकूण ७ कोटी ५० लाख ५७ हजार ४४८ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील २ कोटी ६९ लाख ७६ हजार ७६ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ५१ लाख ९१ हजार २३६ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ३२ लाख ८४ हजार ६३२ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ३४ लाख १९ हजार २३८ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात १२ लाख ९३ हजार २५१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १० लाख ५६ हजार ९६७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख ४३ हजार १०७ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर १६ लाख ९२ हजार ९४१ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.