Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ४ कोटी ९४ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:09 IST

मुंबई : राज्यात रविवारी २ लाख ६ हजार १६३ जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण ४ कोटी ...

मुंबई : राज्यात रविवारी २ लाख ६ हजार १६३ जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण ४ कोटी ९४ लाख १८ हजार ४०१ जणांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात १२ लाख ९१ हजार ६३६ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ९ लाख ४८ हजार २८४ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. २१ लाख ३२ हजार २४६ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर १२ लाख ८६ हजार ५९ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील १ कोटी ४२ लाख ९ हजार २६६ जणांना लसीचा पहिला डोस, तर ११ लाख ६३ हजार ६२५ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ८९ लाख ९ हजार ५८६ जणांना लसीचा पहिला डोस, तर ९४ लाख ७७ हजार ६९९ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.