Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ११ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:06 IST

मुंबई : राज्यात बुधवारी ११ लाख ८ हजार ३१४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर आतापर्यंत राज्यात एकूण ७ कोटी ...

मुंबई : राज्यात बुधवारी ११ लाख ८ हजार ३१४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर आतापर्यंत राज्यात एकूण ७ कोटी ६१ लाख ६५ हजार ७६२ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील २ कोटी ७४ लाख ५२ हजार ८१५ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ५४ लाख ८१ हजार ७९८ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ३४ लाख ७२ हजार ७८३ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ३५ लाख ५८ हजार २०१ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात १२ लाख ९३ हजार ३१० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १० लाख ६१ हजार ३५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख ४३ हजार १६१ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १७ लाख २ हजार ६५९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.