Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दिवसभरात पाच लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:08 IST

मुंबई : राज्यात सोमवारी पाच लाख ३४ हजार ५६८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर आतापर्यंत राज्यात एकूण सहा ...

मुंबई : राज्यात सोमवारी पाच लाख ३४ हजार ५६८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर आतापर्यंत राज्यात एकूण सहा कोटी ३४ लाख ९० हजार ५६७ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यात २१ लाख ४१ हजार ७६ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १५ लाख ४८ हजार १४४ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी १२ लाख ४६ हजार ६०५ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी २० लाख ५ हजार ५६८ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील २ कोटी १३ लाख ५४ हजार ३९३ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर २८ लाख ८४ हजार ४५० लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात १२ लाख ९२ हजार ८१७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १० लाख १७ हजार ५२३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.