Join us

राज्यात दिवसभरात ५ लाखांहून अधिक लाभार्थींना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:06 IST

मुंबई : राज्यात शुक्रवारी ५ लाख ४४ हजार ३०२ लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ७ ...

मुंबई : राज्यात शुक्रवारी ५ लाख ४४ हजार ३०२ लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ७ कोटी ७४ लाख ६६ हजार १३२ लाभार्थींना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील २ कोटी ७९ लाख ८५ हजार ४६२ लाभार्थींनी लसीचा पहिला डोस, तर ५८ लाख ६३ हजार ४३९ लाभार्थींनी दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ३६ लाख ७५ हजार ४ लाभार्थींनी लसीचा पहिला, तर १ कोटी ३७ लाख २५ हजार ६०३ लाभार्थींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात १२ लाख ९३ हजार ३७६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १० लाख ६५ हजार १६९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख ४३ हजार ३०२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर १७ लाख १४ हजार ७७४ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.