Join us

राज्यात दिवसभरात १२ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:07 IST

मुंबई : राज्यात शुक्रवारी १२ लाख ५६ हजार ३११ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ७ ...

मुंबई : राज्यात शुक्रवारी १२ लाख ५६ हजार ३११ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ७ कोटी १९ लाख ९ हजार ४९२ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील २ कोटी ५६ लाख २० हजार ७६२ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ४३ लाख १७ हजार ३१३ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी २७ लाख ८८ हजार ७५० लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ३० लाख ४० हजार ५६३ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात १२ लाख ९३ हजार १७३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १० लाख ४६ हजार ६५७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख ४२ हजार ७६१ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर, १६ लाख ५९ हजार ५१३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.