मुंबई : अकरावीच्या तिस-या प्राधान्य फेरीसाठी शनिवारी रिक्त जागा जाहीर होणार आहेत. आतापर्यंत अकरावी प्रवेशासाठी ‘प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य’च्या दोन फे-या पार पडल्या. तिसºया फेरीत आतापर्यंत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, महाविद्यालयांनी काही कारणांमुळे प्रवेश नाकारलेले, एटीकेटी असलेले, प्रवेश रद्द केलेले, नव्याने नोंदणी करणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. या फेरीत विद्यार्थी आधीचे प्रवेश रद्द करूनही प्रवेश फेरीत सहभागी होऊ शकतात.
अकरावीच्या तिसऱ्या प्राधान्य फेरीसाठी आज रिक्त जागा जाहीर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 06:25 IST