Join us

मुरुड विद्युत वितरण कार्यालयात पदे रिक्तच

By admin | Updated: March 31, 2015 22:21 IST

मुलभूत सुविधांपैकी नियमित विद्युतपुरवठा ही बाब महत्त्वाची बनली आहे. रोहा - धाटाव येथून होणाऱ्या वीजजोडण्या सुपेगाव जंगलातून जात असल्याने मुरुड

मुरूड : मुलभूत सुविधांपैकी नियमित विद्युतपुरवठा ही बाब महत्त्वाची बनली आहे. रोहा - धाटाव येथून होणाऱ्या वीजजोडण्या सुपेगाव जंगलातून जात असल्याने मुरुड शहरात कधीही काळोख होऊ शकतो. गेल्या अनेक वर्षांची उपकेंद्राची मागणी पूर्ण होणार या अपेक्षेने नागरिक आस लावून बसले असले तरी प्रशासनाकडून मात्र या विषयाला गती न मिळाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. मुरुड कार्यालयात उपकार्यकारी अभियंत्यांची जागा गेल्या आॅगस्ट २०१४ पासून रिक्त आहे, तसेच कोकबन व आगरदांडा येथील शाखा कार्यालयात कनिष्ठ अभियंत्यांची पदे रिक्त असल्यामुळे लाइन स्टाफ काम हाताळते. मजगाव सेक्शनमध्ये एक लाइनमन व २ टेक्निशियनची पदे न भरल्यामुळे हंगामी तत्त्वावर कामगार नेमून कामचलाऊ सेवा मिळत आहे. येत्या सप्टेंबर २०१५ मध्ये मुरुड कार्यालयातील दोन लाइनमन वयोमानाप्रामणे निवृत्त होणार आहेत.मुरुड तालुक्यातील विद्युत बिलांची वसुली उत्तम असून वीजचोरीचे प्रमाणही नगण्य आहे. या सर्व बाबींचा विचार करता रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. (वार्ताहर)