नागोठणे : ग्रामीण भागासाठी पाणी पुरवठा योजना तयार करणे, त्याचे काम पूर्ण करून ती कार्यान्वित करणे यासाठी शासनाकडून एम. जे. पी.अर्थात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण स्थापित करण्यात आलेले आहे. या कार्यालयांतर्गत पेण, अलिबाग, पनवेल, महाड आणि माणगाव असे पाच उपविभाग ठेवण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी उपअभियंता पदाच्या प्रत्येकी एका मुख्य अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. पाच कार्यालयांपैकी फक्त महाड येथेच फक्त हा मुख्य अधिकारी कार्यरत असून इतर चार ठिकाणाचे अधिकारी येथून रजा किंवा इतर काही कारणांमुळे कायम गैरहजर राहत असल्याचे उघड झाले आहे. नागोठणे विभाग पेण कार्यालयाच्या अखत्यारीत येतो. गेल्या महिन्यात येथील जल शुद्धीकरण केंद्रात चोरी झाली होती. या चोरीबाबत विचारणा केली असता, संबंधितांनी सविस्तर माहिती उद्या देतो असे सांगितले. मुख्य अधिकारी याठिकाणी गैरहजर रहात असल्याने पाणीपुरवठ्याच्या कामांना विलंब होत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
एमजेपी उपविभागीय कार्यालयात पदे रिक्त
By admin | Updated: January 16, 2015 22:43 IST