Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुदृढ जीवनासाठी योगमार्गाचा अवलंब हवा

By admin | Updated: June 22, 2017 05:47 IST

योग केवळ व्यायाम प्रकार नाही, तर सुदृढ जीवन जगण्याची पद्धती आहे. योगामुळे निसर्गाकडून मानवाला ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोनासाठी आणि सुदृढ जीवनासाठी योग मार्गाचा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : योग केवळ व्यायाम प्रकार नाही, तर सुदृढ जीवन जगण्याची पद्धती आहे. योगामुळे निसर्गाकडून मानवाला ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोनासाठी आणि सुदृढ जीवनासाठी योग मार्गाचा अवलंब प्रत्येकाने आपल्या आयुष्यात केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बुधवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी वरळी येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत विविध प्रकारची योगासने केली.दिव्याज फाउंडेशनच्या सहकार्याने वरळी येथील एन.एस.सी.आय. येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस, आमदार मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ, ज्येष्ठ समाजसेवक शांतीलाल मुथा, वल्लभ भन्साळी, योग तज्ज्ञ मिकी महेता आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगाला आंतरराष्ट्रीय ओळख दिली आहे. प्रत्येक संकटावर मात करण्याचे सामर्थ्य योगामध्ये आहे. त्यामुळे या योग पद्धतीचा सर्वांनी अवलंब करावा,’ असे आवाहन केले. तर अभिनेते जॅकी श्रॉफ म्हणाले की, ‘प्रत्येकाने स्वत:चे आरोग्य सांभाळावे त्याचे जतन करावे, योगाद्वारे प्रत्येक व्यक्ती हे साध्य करू शकतो.’ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांतीलाल मुथा यांनी केले.