Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात रंगला ‘मॅकबेथ बाद्य’चा प्रयोग

By admin | Updated: December 7, 2015 01:29 IST

मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्स विभागातर्फे नुकताच शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’ या शोकांतिकेवर आधारित ‘मॅकबेथ बाद्य’ या नाटकाचा प्रयोग रंगला

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्स विभागातर्फे नुकताच शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’ या शोकांतिकेवर आधारित ‘मॅकबेथ बाद्य’ या नाटकाचा प्रयोग रंगला. या प्रयोगाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद देत कलाकारांना मनमुराद दाद दिली.कोलकाता येथील ‘कसबा अर्घ्य’ची निर्मिती असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध दिग्दर्शक मोनीष मित्रा यांनी केले आहे. मित्रा यांनी भारतीय संगीत आणि पारंपरिक देहबोलीचा वापर करत शरीराच्या माध्यमातून सांगीतिका प्रेक्षकांसमोर उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.या नाटकाचे प्रयोग यापूर्वी हंगेरी, पोलंडमध्ये झाले असून, जगाच्या कानाकोपऱ्यात हे नाटक पोहोचविण्यासाठी कलाकारांची चमू झटत आहे. या नाटकाचे संगीत हृषीकेश हलधर, अयान मुखर्जी आणि जयदीप सिन्हा यांनी केले आहे. नाट्य रसिकांसाठी प्रथमच मुंबईत विनामूल्य पद्धतीने हे नाटक सादर करण्यात आले. (प्रतिनिधी)