मुंबई : मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने शुक्रवारी मालाड आणि विलेपार्ले परिसरातील एका हॉटेल आणि रूममध्ये धाड टाकली. या धाडीत पाच मुलींची सुटका करण्यात आली. पब व पार्टीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी या मुलींचा पार्टनर म्हणून वापर केला जाणार होता, असे अटकेत असलेल्या महिलेने पोलिसांना सांगितले आहे़ यात एका स्ट्रग्लर मॉडेलचाही समावेश असल्याचे समजते़मालाडच्या लिंक रोडवरील इनआॅर्बिट परिसरात असलेल्या ‘जैन सबकुछ प्लाझा’ या हॉटेलमध्ये गैरप्रकार चालत असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. मालाडच्या हॉटेलमध्ये टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये फिझा ऊर्फ तानिया जफर (३२) या महिलेला अटक करण्यात आली आहे. या मुलींना देहविक्रीसाठी आणले नाही़ सध्या मोठमोठ्या पब्स आणि हॉटेलमध्ये होणाऱ्या पार्ट्यांमध्ये ‘ओन्ली कपल्स अलाउड’ असा बोर्ड लावलेला असतो. अशा पार्ट्यांमध्ये मुलींचा पार्टनर म्हणून वापर केला जाणार होता, असे जफरने पोलिसांना सांगितले. या ठिकाणाहून सुटका करण्यात आलेल्या मुलींपैकी एक दिल्ली तर दुसऱ्या दोघी मुंबईतील अंधेरी आणि मालाड परिसरात राहणाऱ्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील एक जण ही स्ट्रगलर मॉडेल असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
पबमध्ये होतोय मुलींचा वापर
By admin | Updated: September 3, 2015 02:13 IST