Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील ‘वॉण्टेड’ला मुंबई विमानतळावर अटक

By admin | Updated: December 29, 2015 02:10 IST

अमेरिकेतील नागरिकांना ५० दशलक्ष डॉलर्सची फसवणूक करून पसार झालेला ‘वॉण्टेड’ आरोपी करिमी सलीमला

मुंबई : अमेरिकेतील नागरिकांना ५० दशलक्ष डॉलर्सची फसवणूक करून पसार झालेला ‘वॉण्टेड’ आरोपी करिमी सलीमला (वय ५०) मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. अमेरिकन तपास यंत्रणांनी काही महिन्यांपूर्वी त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजाविली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.भारतीय नागरिक असलेला करिमी हा गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेमध्ये वास्तव्यास आहे. त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने एक ओव्हर बिलिंग स्किम सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून त्याने स्थानिक महापालिका आणि वित्तीय संस्थांना तब्बल ५० दशलक्ष डॉलर्सना गंडा घातला. करिमी याने अ‍ॅडव्हान्स डेव्हलपमेंट इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशनच्या नावाखाली अल्प उत्पन्न गटातील बांधकाम व्यावसायिकांसाठी ही स्किम सुरू करून त्याची खोटी माहिती देत ही फसवणूक केली होती.अमेरिकन संस्था आणि नागरिकांना गंडा घालून मिळविलेला पैसा करिमी याने भारतीय बँकेतील त्याच्या खात्यामध्ये वळविला. अमेरिकन तपास यंत्रणा आपल्या मागे लागल्याचे लक्षात येताच करिमीने अमेरिकेतून पळ काढला. करिमी पसार झाल्याचे लक्षात येताच अमेरिकेतील तपास यंत्रणेने त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती.