पनवेल : पनवेल शहरात पनवेल नगरपालिकेने हायजेनिक मासळी मार्केट उभारले आहे. त्याकरिता सुमारे दोन कोटी खर्च करण्यात आला असून लवकरच ते लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे उघडय़ावरच्या मासळीबाजारामुळे कोंडलेला उरण नाक्याचा श्वास लवकरच मोकळा होईल. त्याचबरोबर स्वच्छतेचाही बोजवारा न उडता दरुगधीपासून सर्वाचे संरक्षण होणार आहे.
उरण नाक्यावर काही वर्षापूर्वी मासळी मार्केट उभारण्यात आले होते, मात्र त्या ठिकाणी स्वच्छतेचा बोजवारा उडत चालला होता. पायाभूत सुविधांचा अभाव आणि बेकायदेशीर मासळी विक्रेत्यांमुळे रस्त्यावर व्यवसाय करत असल्याने दरुगधी पसरुन स्वच्छतेचा बोजवारा उडत होता, म्हणून या ठिकाणी अत्याधुनिक अशा स्वरूपाचे हायजेनिक असे मासळी मार्केट बांधण्याचा प्रस्ताव आला. पालिकेच्या सभेत हा ठराव मांडण्यात आला.
उरण नाक्यावरील दरुगधीच्या समस्येवर उपाय व मासळी विभागाला हक्काची जागा म्हणून जुनी इमारत जमीनदोस्त करुन त्या ठिकाणी हा अत्याधुनिक बाजार उभारला आहे. याकरिता राष्ट्रीय मासळी मंडळाच्या वतीने 1 कोटी 71 लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला, त्याचबरोबर पालिका प्रशासनाने याकरिता 17 लाख रुपये खर्च केला आहे.
पाण्याचा निचरा करण्याची खास व्यवस्था
4येथे 25क् ओटे बांधण्यात आले असून स्वतंत्र नळजोडणी करण्यात आली आहे.
4मासळी मार्केटच्या पाण्याचा निचरा करण्याकरिता खास व्यवस्था करण्यात आली आहे.
4ग्राहकांना नाकाला रुमाल लावून मासळी खरेदी करण्याची गरज भासणार नाही इतकी स्वच्छता या ठिकाणी असणार आहे.
4बाहेर रस्त्यावर बसणारे मासळी विक्रेते या बाजारात बसून अधिकृतरीत्या व्यवसाय करणार असल्याने उरण नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे.
4बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच या मार्केटचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकारी संजय कटेकर यांनी लोकमतला दिली.