Join us

औद्योगिक संशोधनासाठी अद्ययावत संस्था

By admin | Updated: August 24, 2015 00:56 IST

आयआयटी मुंबईने मोनाश विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या ‘आयआयटी-मोनाश’ अकादमीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले.

मुंबई : आयआयटी मुंबईने मोनाश विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या ‘आयआयटी-मोनाश’ अकादमीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. आॅस्ट्रेलियाचे शिक्षण आणि प्रशिक्षण मंत्री क्रिस्टोफर पाईन यांच्या हस्ते करण्यात आले.या सोहळ््यास आयआयटी मुंबईचे संचालक प्रो. देवांग खक्कर, मोनाश विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. मार्गारेट गार्डनर यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘इंडिया स्ट्रॅटेजिक फंड’च्या माध्यमातून आॅस्ट्रेलिया सरकारने अकादमीसाठी १५ लाख आॅस्ट्रेलियन डॉलर्स निधी उपलब्ध करून दिला.