मुंबई : इंटरनेट क्षेत्र वेगाने पुढे सरकत असून, सर्व सरकारी सेवा ऑनलाइन प्रदान करण्यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून नागरिकांना पासपोर्ट काढताना त्यांच्या अडचणींत भर पडू नये किंवा ही प्रक्रिया वेगाने व्हावी म्हणून अधिकाधिक सुलभ प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती पासपोर्ट कार्यालयाने दिली.
मनीलाइफ फाउंडेशनच्या वतीने अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यशाळेत मुंबई आणि ठाणो क्षेत्रतील पासपोर्ट कार्यालयांना सेवा प्रदान करणा:या टीसीएसच्या वतीने सुलभ प्रक्रियेबाबत अधिक माहिती दिली.
मुंबईच्या क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी स्वाती कुलकर्णी यांनी कार्यशाळेत नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. पासपोर्ट प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, ऑनलाइन अपॉइंटमेंट सिस्टीमदेखील आणखी सुलभ कशी करता येईल, यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
पासपोर्ट प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणो राबविण्यासाठी आहे त्या ऑनलाइन प्रक्रियेत आणखी गुणात्मक सेवा प्रदान करण्यावर भर देण्यात येईल, असे सांगतानाच देशभरात 78 पासपोर्ट सेवा केंद्रे कार्यरत असून, जिल्हा स्तरावर
ही व्याप्ती वाढविण्यासाठी विचारविनियम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
पासपोर्ट कार्यालय मेळावा
पारपत्र (पासपोर्ट) सेवांची वाढती मागणी तसेच नागरिकांना तारीख मिळवण्यात येणा:या अडचणी लक्षात घेऊन मुंबईच्या क्षेत्रीय पारपत्र कार्यालयाने 2क् डिसेंबर रोजी ‘ऑनलाइन अपॉइंटमेंटसह पारपत्र मेळावा’ सर्व पारपत्र सेवा केंद्रावर आयोजित केला आहे. मुंबई क्षेत्रीय पारपत्र कार्यालयाच्या अखत्यारीतील मुंबई, औरंगाबाद, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दमण, दादरा नगर आणि हवेली, सिल्व्हासा येथील अर्जदारांनी 666.स्रं22स्र13्रल्ल्िरं.ॅ5.्रल्ल या संकेतस्थळावर नोंदणी करून आणि शुल्क भरून आपली भेट निश्चित करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.