Join us

माहिती अद्ययावत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:06 IST

खगोलशास्त्र अभ्यासक्रममुंबई : छत्तिसाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या खगोल मंडळाने, खगोलशास्त्रात रुची असलेल्या सर्वांसाठी प्राथमिक अभ्यासक्रमाचे आयोजन केले आहे. ...

खगोलशास्त्र अभ्यासक्रम

मुंबई : छत्तिसाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या खगोल मंडळाने, खगोलशास्त्रात रुची असलेल्या सर्वांसाठी प्राथमिक अभ्यासक्रमाचे आयोजन केले आहे. १० जुलै ते १७ ऑक्टोबर २०२१ दरम्यान दर शनिवारी सायंकाळी ७ ते रात्री ८.३० या वेळेत होणाऱ्या या ऑनलाईन अभ्यासक्रमात प्रामुख्याने खगोलशास्त्राचा इतिहास, सूर्य, सौरमाला, ताऱ्यांचे जन्म-मृत्यू, खगोलीय घटना, आकाश निरीक्षण साधने इत्यादी विषयांचा समावेश आहे. अभ्यासक्रमाचा लाभ महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्राध्याधपक, हौशी खगोलप्रेमी व अभ्यासक यांना घेता येईल.

वाचनालय वास्तूचे सुशोभिकरण

मुंबई : कुर्ला पश्चिम येथील कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालय प्रबोधिनी सुशोभिकरण एनआरएस फाऊंडेशनतर्फे करण्यात आले असून, या नवीन वास्तुचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कल्याणकारी उपक्रम या वाचनालयातून होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले गेले. कार्यक्रमाला मुंबईतील नामांकित समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते, असे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले.