मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधवराव सदाशिव गोळवलकर तथा श्रीगुरुजींच्या मूर्तीचे अनावरण संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते मंगळवारी भिवंडी (ठाणे) तालुक्यातील वेल्हे गावातील लोढा धाममध्ये होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात श्रीगुरुजींच्या नावाने स्थापन केलेल्या ‘स्कील डेव्हलपमेंट सेंटर’चे उद्घाटन करण्यात येणार आहे.वेगवेगळ्या संप्रदायातील धर्मगुरू व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास खा. कपिल पाटील, बिर्ला कॉलेजचे प्राचार्यडॉ. नरेशचंद्र, डोंबिवली विद्या निकेतनचे प्राचार्य डॉ. विवेक पंडित प्रमुख पाहुणे असतील. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}