Join us

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

By admin | Updated: March 26, 2017 05:45 IST

अल्पवयीन मुलावर त्याच्याच वडिलांच्या मित्राने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना कांदिवलीत उघड झाली

मुंबई : अल्पवयीन मुलावर त्याच्याच वडिलांच्या मित्राने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना कांदिवलीत उघड झाली आहे. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी शनिवारी या मित्राला अटक केली आहे. शशी मिश्रा (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.समतानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा दिवसांपूर्वी राजू (नावात बदल) हा मुंबईला उपचारासाठी आला होता. लहानपणी पडल्याने त्याच्या मेंदूला मार लागला, ज्याचा त्याला त्रास होत होता. राजूचे वडील आणि मिश्रा हे व्यवसायाने ड्रायव्हर असून, ते एकाच खोलीत एकत्र राहत होते. तसेच ते दोघे एकाच गावचे असल्याने राजूला उपचारासाठी मुंबईला आणण्याचा सल्लादेखील मिश्रानेच दिला होता. वडील कामावर गेले की मिश्रा घरी यायचा. त्या वेळी घरी एकट्या राजूवर त्याने अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गेले पंधरा दिवस सतत तो राजूवर अत्याचार करत होता. त्याच्या वागण्यातील बदल लक्षात आल्याने वडिलांनी त्याला विश्वासात घेतले. तेव्हा त्याने सर्व काही वडिलांना सांगितले. (प्रतिनिधी)मिश्रावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. २८ मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकारणामुळे राजूच्या मनावर फार मोठा परिणाम झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.- दिलीप यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समतानगर पोलीस ठाणे