Join us

स्मशान कर्मचाऱ्यांचे मुंबईत बेमुदत आंदोलन

By admin | Updated: October 1, 2015 02:48 IST

मुंबई महानगरपालिकेच्या स्मशानभूमींमधील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्त्वाखाली पालिकेविरोधात २ आॅक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या स्मशानभूमींमधील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्त्वाखाली पालिकेविरोधात २ आॅक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे, असे युनियनचे नेते गोविंद कामतेकर यांनी दिली.फावडा, झाडू आणि अंत्यविधीनंतरच्या कामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करण्यातही प्रशासन दिरंगाई करत आहे. विद्युत दाहिन्यांच्या देखभालीतही प्रशासन कमी पडत आहे. युनियनने ९ जुलै २०१५ रोजी कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी झालेल्या बैठकीत आॅगस्ट २०१५ अखेरपर्यंत मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर ५ सप्टेंबर आणि १४ सप्टेंबर रोजी आयुक्त अजय मेहता यांना निवेदन देऊन युनियनने कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. मात्र प्रशासनाचा प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर बेमुदत संप करावा लागत असल्याचे कामतेकर म्हणाले.