Join us

मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

By admin | Updated: July 6, 2017 04:59 IST

भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याविरोधात विशेष न्यायालयाने अजामीनपात्र

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याविरोधात विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजाविले आहे. आर्थिक अफरातफरी प्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आले आहे. मल्ल्याने थकविलेले पैसे आणि बँकांबरोबर केलेल्या व्यवहारप्रकरणी सीबीआयने नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. विजय मल्ल्यावर भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवल्याचा  आरोप आहे.