Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचे उपकेंद्र १ आॅगस्टपासून सुरू

By admin | Updated: June 14, 2014 23:50 IST

मुंबई विद्यापीठाचे ठाणे उपकेंद्र येत्या १ आॅगस्टपासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी दिली.

ठाणे : मुंबई विद्यापीठाचे ठाणे उपकेंद्र येत्या १ आॅगस्टपासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी दिली. त्याचा औपचारीचा शुभांरभ येत्या १६ जुलै रोजी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्याचे खा. राजन विचारे यांच्यासह त्यांनी नुकताच या उपकेंद्राच्या इमारतीचा पाहणी दौरा केला. ठाण्यातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबईला जावे लागते. त्यामुळे ठाण्यात विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी २००७ मध्ये ढोकाळी येथील २५१५१ चौ.मी. जागा ठाणे पालिकेने विद्यापिठाला हस्तांतरीत केली. परंतु विद्यापिठाच्या कामाला गती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना तब्बल सात वर्षे याची प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर आता येत्या १ आॅगस्टपासून विद्यार्थ्यांना या उपकेंद्राचा लाभ होणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून बीबीए, एलएलबी, एमएमएस, एमबीए हे ६० विद्यार्थीक्षमता असलेले पाच वर्षांचे एण्टीग्रेटेड कोर्सेस सुरू होणार आहेत. तसेच याची प्रवेशप्रक्रिया आता सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)