Join us

विद्यापीठाच्या उप कुलसचिवांची नियुक्ती बेकायदा ?

By admin | Updated: November 11, 2014 01:58 IST

मुंबई विद्यापीठाच्या उप कुलसचिव योगिनी घारे यांची नियुक्ती बेकायदा असल्याचा आरोप मुंबई विद्यापीठ आणि महाविद्यालय शिक्षक असोशिएशन (मुक्ता) या संघटनेने केला आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या उप कुलसचिव योगिनी घारे यांची नियुक्ती बेकायदा असल्याचा आरोप मुंबई विद्यापीठ आणि महाविद्यालय शिक्षक असोशिएशन (मुक्ता) या संघटनेने केला आहे. घारे यांची नियुक्ती रद्द करून त्यांची नियुक्ती करणा:या अधिका:यांवरही कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने उच्चशिक्षण सहसंचालकांकडे केली आहे.
विद्यापीठाने दिलेल्या जाहिरातीमध्ये उप कुलसचिव पदासाठी 38 वयोमर्यादा असावी, असे म्हटले होते. घारे यांनी या पदासाठी अर्ज केला तेव्हा त्यांचे वय 41 वर्ष होते. तरीही छाननी समिती व निवड समितीने त्यांचा अर्ज पात्र ठरवून त्यांची नियुक्ती जाहीर केली. माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीमध्ये घारे यांची नियुक्ती बेकायदा असल्याचा दावा मुक्ता संघटनेने केला आहे. याबाबत संघटनेने उच्चशिक्षण विभाग कार्यालयाकडे दोन महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार केला होता. या पत्रला विभागाकडून उत्तर आलेले नाही.
संघटनेने विभागाच्या सहसंचालक मंजूषा मोळवणो यांना पत्र देऊन घारे यांची नियुक्ती बेकायदा असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या पगारावर होणारा खर्च हा जनतेचा असून त्याची बेकायदा पद्धतीने होणारी उधळपट्टी थांबवावी, तसेच जबाबदार संबंधित अधिका:यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेचे सचिव सुभाष आठवले यांनी केली आहे. (प्रतिनिधी)