Join us

विद्यापीठ सागरी अध्ययनातील जागतिक दर्जाचे केंद्र व्हावे- राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठात नव्याने स्थापन होत असलेले सेंटर फॉर एक्सलेंस इन मेरिटाईम स्टडीज हे सागरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विद्यापीठात नव्याने स्थापन होत असलेले सेंटर फॉर एक्सलेंस इन मेरिटाईम स्टडीज हे सागरी अध्ययन केंद्र आजच्या आणि भविष्यकालीन गरजा ओळखून, उत्कृष्ट दर्जाचे संशोधन करून कुशल मनुष्यबळ तयार करणारे जागतिक दर्जाचे केंद्र व्हावे, असे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी म्हणाले. सोमवारी त्यांच्या हस्ते सेंटर फॉर एक्सलेंस इन मेरिटाईम स्टडीज या सागरी अध्ययन केंद्रांचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी हे मत मांडले.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर म्हणाले, सेंटर फॉर एक्सलेंस इन मेरिटाईम स्टडीज या केंद्राच्या माध्यमातून सागरी विकास आणि त्यासंबंधीचे गुणवत्तापूर्वक शिक्षण देऊन सागरी आव्हानांची उकल तसेच विद्यार्थ्यांमधील ज्ञानासोबत कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वसमावेशक आणि समकालीन समग्र पद्धतीने विकासात्मक दृष्टिकोनातून मानव्यविद्या, कायदा, वाणिज्य व व्यवस्थापन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा आंतरविद्याशाखीय माध्यमातून प्रशिक्षित केले जाणार आहे.

..................