Join us

रस्त्याच्या कामासाठी विद्यापीठाची जागा

By admin | Updated: October 24, 2016 04:39 IST

वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक जोडणी आणि उर्वरित रस्त्यांच्या कामासाठी मुंबई विद्यापीठ कालिना संकुलातील तब्बल ३४ हजार ७१५ चौरस मीटर जागा मुंबई महानगर

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक जोडणी आणि उर्वरित रस्त्यांच्या कामासाठी मुंबई विद्यापीठ कालिना संकुलातील तब्बल ३४ हजार ७१५ चौरस मीटर जागा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला देणार आहे. ही जागा प्राधिकरणाला प्राप्त झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या टीडीआर विक्रीच्या मिळकतीमधून विद्यापीठासाठी वसतिगृह, कर्मचाऱ्यांसाठी घरे, गेस्टहाउस, सायन्स ब्लॉक ही कामे करता येणार असून, हा विकास ३ लाख चौरस मीटर परिसरात होणार आहे.वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स जंक्शनकडून पश्चित द्रुतगती महामार्गाजवळील वाकोला जंक्शनपर्यंत १.२ किलोमीटर लांबीचा, जाण्या-येण्यासाठी २ मार्गिका असणारा उन्नत रस्ता बांधण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठ प्राधिकरणाला १८ हजार ८३४ चौरस मीटर जागा देणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या परिसरात प्राधिकरणातर्फे ४०० मीटर लांब आणि ३० मीटर रुंद असा रस्ता बांधण्यात येणार आहे. त्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुलातून सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याकडे जाणे सोईस्कर ठरणार आहे. या रस्त्यासाठी विद्यापीठ प्राधिकरणाला १५ हजार ८८१ चौरस मीटर जागा देणार आहे. (प्रतिनिधी)वांद्रे-कुर्ला संकुलास उत्कृष्ट जोडणी उपलब्ध करून देण्यासाठीची व्यवस्थासागरीसेतू ते बीकेसी : हा प्रस्तावित फ्लायओव्हर सागरीसेतूकडून बीकेसीमध्ये प्रवेश करण्यासाठी सिग्नलरहित असेल.बीकेसी ते सागरीसेतू : हा फ्लायओव्हर बीकेसीकडून सागरीसेतूपर्यंत पोहोचण्यासाठी सिग्नलरहित असेल.कलानगरपासून सागरी सेतूच्या दिशेने जाणारा रस्ता सायन-धारावीकडून येणाऱ्या वाहतुकीस चालना देईल.फ्लायओव्हरची लांबी १ हजार ८८८ मीटर इतकी असेल. यावर जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी दोन मार्गिका असतील. या प्रकल्पाची किंमत २५३ कोटी आहे.