Join us  

मुंबई विद्यापीठ : स्टुडंट कौन्सिल निवडणुकीची चुरस! युवा सेनेविरोधात अभाविप अध्यक्षपदासाठी आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 3:52 AM

मुंबई विद्यापीठात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी होणा-या निवडणुकीत युवा सेना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुन्हा आमनेसामने उभे ठाकणार आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी होणा-या निवडणुकीत युवा सेना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुन्हा आमनेसामने उभे ठाकणार आहेत. याआधी कौन्सिलच्या सचिवपदासाठी आलेल्या अर्जांमध्ये सौरभ सोळंकी या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने या पदासाठी ग्रेविल गोन्साल्वीस यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीची घोषणा सोमवारी होईल.कौन्सिलच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक होणार असून निवडणुकीचा निकालही सोमवारीच जाहीर केला जाईल. अध्यक्षपदासाठी दोन्ही विद्यार्थी संघटनांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दोन्ही संघटनांच्या पुरस्कृत उमेदवारांमध्ये ही लढत रंगणार असून शुक्रवारी निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या वेळी अध्यक्ष आणि सचिवपदासाठी दाखल केलेल्या अर्जांमधील प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला.

टॅग्स :मुंबई विद्यापीठनिवडणूकविद्यार्थी