मुंबई : मुंबई विद्यापीठाचा २0१५-१६ या शैक्षणिक वर्षाचा तुटीचा अर्थसंकल्प बुधवारी विद्यापीठाच्या सिनेट बैठकीमध्ये सादर करण्यात आला. ४६५.२0 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून या शैक्षणिक वर्षामध्ये सुमारे ७६.६२ कोटी तूट दर्शविण्यात आली आहे. तर अर्थसंकल्पात केवळ पाच नवीन योजनांचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी केवळ ६0 लाखांची तुटपुंजी तरतूद करण्यात आल्याने सिनेट सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.कुलगुरु डॉ. राजन वेळूकर यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपुष्टात येत असल्याने २0१५-१६ या शैक्षणिक वर्षाचा अर्थसंकल्प अखेरचा आहे. या अर्थसंकल्पात कुलगुरु नवीन कोणत्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु बुधवारी सिनेट बैठकीमध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पाने सिनेट सदस्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या. नवीन अर्थसंकल्पात गेल्या वर्षी हाती घेण्यात आलेल्या विद्यापीठातील १७ इमारतींच्या बांधकामासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. तर १६ नवीन इमारतींची बांधकामे हाती घेण्याचे ठरविले आहे.यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील मॉडेल कॉलेजचे बांधकाम, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप येथील सिंधु स्वाध्याय संस्थेचे बांधकाम, रत्नागिरी जिल्ह्यातील अंबावडे येथील मॉडेल कॉलेजच्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम, ठाणे जिल्ह्यात मुली व मुलांसाठी वसतीगृहाचे बांधकाम, विद्यानगरी येथील शिक्षकेत्तर निवासाचे बांधकाम अशी सुमारे १६ बांधकामे होतीलविद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल स्टडिज सेंटर स्थापन करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. परंतु यासाठी केवळ १0 लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याने सिनेट सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. किर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सिनेट सदस्य डॉ. व्ही.एन.मगरे यांनी या सेंटरसाठी किमान १ कोटींची तरी तरतूद विद्यापीठाने करावी, अशी मागणी लावून धरली. डॉ. आंबेडकर यांच्या नावाला साजेसे असे सेंटर उभारण्यासाठी विद्यापीठाने अर्थसंकल्पात केलेली तरतूद अत्यल्प असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.ग्रुप आॅफ कम्युनिटी कॉलेजेस आणि सेंटर फॉर एक्सलन्स इन कम्युनिटी कॉलेजेस या योजनेसाठी १0 लाख, नॅशनल इन्टीग्रेशन कॅपसाठी १0 लाख, नॅक कन्व्हेन्शनसाठी ५ लाख आणि फॅकल्टी क्लबसाठी २५ लाखांची तरतूद विद्यापीठाने केली आहे. विद्यापीठाला मिळालेल्या देणगीमध्ये डॉ. आंबेडकर यांचे राजकीय अर्थशास्त्र या विषयाचे अध्यासनाकरिता रिझर्व्ह बॅक आॅफ इंडियाने ६२ लाख ४0 लाखांची देणगी दिलेली आहे. (प्रतिनिधी)च्जमीन आणि इमारत यासाठी १0 कोटी, यंत्रसामुग्रीसाठी ४१ लाख, साधनसामुग्री व फर्निचर खरेदीसाठी १,६१९ लाख, पुस्तकांसाठी २७३.९७ लाख आणि अन्य खर्चासाठी ९३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. २0१४ -१५ या आर्थिक वर्षात विद्यापीठाच्या विविध उपक्रमासाठी विविध संस्थांनी २ कोटी ४४ लाख ९0 हजार रुपयांची देणगी दिलेली आहे.
विद्यापीठाचा तुटीचा अर्थसंकल्प
By admin | Updated: March 26, 2015 02:00 IST