Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाकडून बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्स सत्र ६ चा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:06 IST

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या अंतिम वर्षाच्या मे २०२१ मध्ये संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या वाणिज्य शाखेचा ...

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या अंतिम वर्षाच्या मे २०२१ मध्ये संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या वाणिज्य शाखेचा तृतीय वर्ष बीकॉम (अकाऊंटिंग अँड फायनान्स) सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, या परीक्षेचा निकाल ९७.३५ टक्के लागला आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.

या परीक्षेत एकूण ९ हजार ७१ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला १० हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १० हजार २४८ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते, तर ११ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. या परीक्षेत २४७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यापीठाने आजपर्यंत २०२१च्या उन्हाळी सत्राचे ९३ निकाल जाहीर केले आहेत.

दृष्टिक्षेपात निकाल

नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी - १०,२५९

परीक्षेला उपस्थित विद्यार्थी - १०,२४८

अनुपस्थित विद्यार्थी - ११

अनुत्तीर्ण विद्यार्थी - २४७

उत्तीर्णतेची टक्केवारी - ९७.३५