मुंबई : महापालिकेतील मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्या संकल्पनेतून दिवाळीचे औचित्य साधत दादर येथील शिवाजी पार्कवर सेल्फी छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी पार्कवरील जॉगिंग ट्रॅकवर रंगबेरंगी अशा १०० फुलपाखरांची चित्रे रेखाटण्यात आलेली आहेत. आणखी १०० फुलपाखरांची चित्रे काढण्यात येत आहेत. ही चित्रे सुरेशचंद्र तारकर यांनी चितारली आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी रंगबेरंगी फुलपाखरांसोबत सेल्फी काढायचे आहेत. सेल्फी काढताना पारंपरिक वेष असणे गरजेचे आहे. ९ नोव्हेंबरपासून सुरू होणारी ही स्पर्धा चार दिवस चालणार आहे. काढलेला सेल्फी फेसबुकवरील ँ३३स्र://े.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे/२ँ्र५ं्न्र-स्रं१‘-२ी’ा्री-स्रङ्म्रल्ल३-910523512316667/ लिंकवर अपलोड केल्यानंतर ज्या छायाचित्राला अधिकाधिक लाइक्स येतील, त्या स्पर्धकाला मनसेतर्फे गौरवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
अनोखी सेल्फी छायाचित्र स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2015 02:53 IST