Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी युनिसेफचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाबत जनजागृतीसाठी युनिसेफ आणि मध्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाबत जनजागृतीसाठी युनिसेफ आणि मध्य रेल्वेचा पुढाकार घेतला आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, कल्याण आणि इतर स्थानकांत कोरोना जनजागृतीसाठी डिजिटल स्क्रीन लावण्यात येणार आहेत. या स्क्रीनवर मास्क, सोशल डिस्टन्स, हात धुणे, हँन्ड सॅनिटायझर याबाबत मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये संदेश दिले जाणार आहेत.

युनिसेफ महाराष्ट्रचे चीफ ऑफ फिल्ड ऑफिस राजेश्वरी चंद्रशेखर म्हणाल्या की, राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी मास्क, सोशल डिस्टन्स, वैयक्तिक स्वच्छता, यावर भर द्यायला हवा. तसेच कोरोना विरोधातील लढा जिंकण्यासाठी सर्वानी एकत्र यावे, असेही त्या म्हणाल्या.

===Photopath===

290321\img-20210327-wa0009.jpg

===Caption===

कोरोना जनजागृती