Join us

अवेळी पावसाचा खोपोलीला तडाखा

By admin | Updated: May 15, 2015 23:04 IST

अवेळी पावसाने शुक्रवारी खोपोलीतील अनेक घरांचे नुकसान केले. सायंकाळी जोरदार कोसळलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.

खालापूर : अवेळी पावसाने शुक्रवारी खोपोलीतील अनेक घरांचे नुकसान केले. सायंकाळी जोरदार कोसळलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्याने अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. शहराच्या विविध भागामध्ये पाणी तुंबल्याचे प्रकार समोर आले आहेत. मुख्याधिकारी दीपक सावंत यांनी विविध ठिकाणी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. आपत्ती विभागाचे पथक परिस्तिथिवर नियंत्रण मिळविण्यासाठी तर नागरिकांना सहकार्य करण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे . यावेळी नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील तर ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबले असेल त्या ठिकाणी पाण्याला वाट मोकळी देण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी दीपक सावंत यांनी सांगितले. (वार्ताहर)