लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव / कोचुवेलीदरम्यान विशेष गाड्यांची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या पावसाळ्याच्या वेळापत्रकानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत धावतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असून फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच बसण्याची परवानगी दिली जाणार आहे.
सर्व विशेष गाड्यांसाठी आरक्षण विशेष शुल्कासह ८ जुलैपासून सर्व पीआरएस केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव दि्व - साप्ताहिक डबल डेकर स्पेशल गाडी २ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबरदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवारी आणि बुधवारी ०५.३३ वाजता सुटेल आणि त्याचदिवशी १७.०० वाजता मडगाव येथे पोहोचेल. पुढे १ ऑक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर सोमवारी व गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०५.३३ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मडगावला १६.४५ वाजता पोहोचेल.
मडगाव येथून विशेष गाडी ३ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबरदरम्यान मडगाव येथून दर मंगळवार व गुरुवारी ०५.०० वाजता सुटून त्याच दिवशी १८.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. पुढे १ नोव्हेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर मंगळवार व शुक्रवारी मडगाव येथून ०६.०० वाजता सुटेल आणि त्याचदिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला १७.०० वाजता पोहोचेल. या गाडीसाठी ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिविम हे थांबे असणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव साप्ताहिक विशेष गाडी दिनांक ७ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबरदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शनिवारी ००.४५ वाजता (शुक्रवार / शनिवारी मध्यरात्री) सुटेल आणि त्याचदिवशी मडगावला १३.२५ वाजता पोहोचेल (मान्सून वेळापत्रकानुसार) आणि पुढे १ नोव्हेंबरपासून पुढे पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मडगावला ११.१५ वाजता पोहोचेल.
मडगाव येथून विशेष गाडी ८ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबरदरम्यान दर रविवारी मडगाव येथून १२.१५ वाजता सुटेल आणि त्याचदिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे २३.४५ वाजता पोहोचेल. पुढे ७ ऑक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत मडगाव येथून १२.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला २३.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी येथे थांबणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस - कोचुवेली दि्व-साप्ताहिक विशेष गाडी ३ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबरदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवार आणि शनिवारी १६.५५ वाजता सुटेल आणि कोचुवेलीला दुसऱ्या दिवशी २३.०० वाजता पोहोचेल. २ ऑक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.५५ वाजता सुटेल आणि कोचुवेलीला दुसऱ्या दिवशी २०.२५ वाजता पोहोचेल. कोचुवेली येथून विशेष गाडी ५ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबरदरम्यान दर गुरुवार आणि सोमवारी ००.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवशी ०८.०० वाजता पोहोचेल. पुढे १ नोव्हेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत कोचुवेली येथून ००.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पेरनेम, मडगाव, कारवार, भटकळ, उडुपी, मंगलुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, थलासेरी, कोझिकोड, तिरुर, शोरानूर, थ्रिसूर, एर्नाकुलम टाऊन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेन्गन्नुर, कोल्लम येथे थांबणार आहे.