अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येमागचे गूढ कायम
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येमागचे गूढ कायम
अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येमागचे गूढ कायम
अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येमागचे गूढ कायममुंबई - विक्रोळीच्या गोदरेज कॉलनीत राहणार्या रिंकी चौहान या अकरावीच्या विद्यार्थिनीने गुरुवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. रिंकीच्या आत्महत्येमागचे गूढ कायम असून याप्रकरणी विक्रोळी पोलीस अधिक तपास करत आहे.रिंकी आई वडील आणि दोन भावंडासह विक्रोळी गोदरेज वसाहतीत राहण्यास होती. गुरुवारी शिकवणीहून घरी आल्यानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून रिंकीने मोबाइल फोन वापरणे बंद केले होते. मोबाईल फोन अचानक बंद करण्यामागचे कारण, आत्मह्त्येचा याच्याशी काही संबध आहे का? अशा नानाविध प्रशांंची उत्तरे पोलीस शोधत आहेत. त्यामुळे रिंकीच्या आत्महत्येचे गूढ अद्यापही कायम असून याप्रकरणी आई वडील, नातेवाईक, शाळा, शिकवणीतील शिक्षकांसह तिच्या मित्रमैत्रीणेकडे कसून चौकशी सुरु असल्याचे विक्रोळी पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)