मुंबई : थर्टिफर्स्टला तुम्ही एखाद्या पार्टीचे आयोजन करून त्यासाठी तिकीट किंवा पासची विक्री करीत असाल आणि तुमच्याकडे त्याचा परवाना नसेल, तर सावधान! कारण मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने अशा विनापरवाना पार्ट्यांवर धडक कारवाई करण्यासाठी चार विशेष पथकांची नेमणूक केली आहे.यासंदर्भात मुंबई शहराचे अपर जिल्हाधिकारी डॉ. अशोक करंजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत प्रशासनाकडून १७ आयोजकांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी ३० आयोजकांनी विभागाकडून प्रशासकिय परवानगी घेतली होती. अद्याप अनेक परवानग्यांचे अर्ज प्रस्तावित आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत परवानग्यासाठी अर्ज येतात. त्यामुळे अगदीच शेवटच्या क्षणीही कागदपत्रांची पूर्तता केलेली असेल, तर अर्ज निकाली काढून संबंधित आयोजकाला परवानगी दिली जाते. दरम्यान विनापरवाना पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर प्रशासन सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करते. त्यासाठी प्रशासनाने चार विविध पथके नेमली आहेत. (प्रतिनिधी)
विनापरवाना थर्टिफर्स्ट महागात!
By admin | Updated: December 24, 2014 01:08 IST