Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिच्या मृत्यूच्या कारणाबाबत अनभिज्ञ

By admin | Updated: July 2, 2014 00:16 IST

सुनीता गोविंद शिंदे या महिलेचा मृत्यू डेंग्यूने झाला नसल्याचा दावा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्याकीय आरोग्य विभागाने केला आहे़

कल्याण : सुनीता गोविंद शिंदे या महिलेचा मृत्यू डेंग्यूने झाला नसल्याचा दावा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्याकीय आरोग्य विभागाने केला आहे़ मात्र, मृत्यूच्या कारणाबाबत पालिका अनभिज्ञ आहे. सोनारपाड्यातल्या सुनीताला ताप आल्याने डोंबिवलीतील डॉ. आनंद हर्डीकर यांच्या खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. परंतु प्रकृती गंभीर बनल्याने तिला केईएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे तिचा शनिवारी मृत्यू झाला. तीचा मृत्यू डेंग्यूसदृश आजाराने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉ़ हर्डीकरांनी व्यक्त केला असताना पालिकेचे मात्र तिचा डेंग्यूने झाला नसल्याचे म्हणणे आहे. यासंदर्भात केडीएमसी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लीलाधर मस्के म्हणाले, नेमका मृत्यू कशामुळे झाला हे सांगता येणार नाही़ केईएमच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)