Join us  

दादर मंडईतील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 2:05 AM

महापालिकेची धडक कारवाई : १५० फेरीवाल्यांवर बडगा, पदपथांनीही अखेर घेतला ‘मोकळा श्वास’

मुंबई : दादर स्टेशनला लागून असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईला बसलेला अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा अखेरीस सुटला आहे. ‘लोकमत’ने गुरुवारी, १७ मे रोजी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होेते. ‘लोकमत’च्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर महापालिके ला जागी झाली आहे. काल मंगळवारी पहाटे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली. त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील मंडईतील व्यापाऱ्यांनी आता ‘मोकळा श्वास’ घेतला आहे.दादर स्टेशनला लागून असलेल्या कविवर्य केशवसूत उड्डाणपुलाखाली पहाटे ५ ते सकाळी ८ या तीन तासांत हे अनधिकृत फेरीवाले ठाण मांडून बसायचे. याचा मोठा फटका दादर मंडईतील व्यापाºयांना बसत होता. ‘लोकमत’ने गेले आठवडाभर या समस्येचा पाठपुरावा केला होता. अखेरीस जी नॉर्थ वॉर्डच्या अतिक्रमण विरोधी विभागाने मंगळवारी भल्या पहाटे या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई केली. जी नॉर्थ वॉर्डच्या अतिक्रमण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र भोेसले आणि रमेश कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवाजी पार्क पोलिसांच्या मदतीने संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. यात दादर स्टेशनसमोरील सुविधा स्टोअर्सपासून, क्रांतिसिंह नाना पाटील मंडईपर्यंत अनधिकृतपणे धंदा करणाºया तब्बल १५० फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. या फेरीवाल्यांकडे असलेले सामानही जप्त करण्यात आले आहे. या वेळी फेरीवाल्यांनी कोणताही हंगामा करू नये, म्हणून शिवाजी पार्क पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. सामान जप्तीबरोबरच, यापुढे या परिसरात अनधिकृतपणे धंदा न करण्याची सक्त ताकीदही पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे.उच्च न्यायालयाच्या निर्णयालाही बगलउच्च न्यायालयाने रेल्वे स्टेशनपासून १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव केला आहे. मात्र, या निर्णयाला बगल देत दादर स्टेशनला लागून हे अनधिकृत फेरीवाले दररोज पहाटे ५ ते सकाळी ८ या तीन तासांत राजरोसपणे धंदा करत होते. याचा मोठा फटका नियमितपणे कर भरणाºया व्यापाºयांना बसत होता. त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. मात्र, मंगळवारच्या धडक कारवाईमुळे येथील व्यापाºयांनी मोकळा श्वास घेतला आहे.महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईने आम्हाला निश्चितच आनंद झाला आहे. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे पालिकेला जाग आली आणि त्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून योग्य तो धडा शिकविला. त्यामुळे ‘लोकमत’चे आम्ही मनापासून आभार मानतो. महापालिकेने आता ही कारवाई करून शांत बसू नये. या अनधिकृत फेरीवाल्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाने सतत या कारवाया करत राहणे गरजेचे आहे.- शंकरराव पाटील, भाजी व्यापारी, दादर.जी नॉर्थ वॉर्डचे सहायक आयुक्त खैरनार यांच्या आदेशानुसार आम्ही मंगळवारी ही मोहीम राबविली. यात १५० हून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. जवळपास तीन तास ही कारवाई चालली. दादर स्टेशनच्या आसपासचा परिसर आणि क्रांतिसिंह नाना पाटील मंडईच्या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्यात आले असून, पदपथ पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे.- रवींद्र भोसले, वरिष्ठ निरीक्षक, अतिक्रमण विभाग, जी नॉर्थ वॉर्ड.

टॅग्स :फेरीवालेदादर स्थानक