वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पेल्हार व विरार विभागीय कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने फुलपाडा व पेल्हार परिसरातील अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त केली. या कारवाईच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता.गांधीचौक भागात उभारण्यात आलेली बेकायदेशीर इमारत तोडण्यात आली. तर धानीव क्षेत्रामध्ये औद्योगिक गाळे काल हाती घेतलेल्या मोहिमेमध्ये जमीनदोस्त करण्यात आले. सुमारे १० ते १२ गाळ्यांवर ही कारवाई केली. महानगरपालिकेने ५ लाखाचा दंड आकारला आहे.
अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
By admin | Updated: January 6, 2015 22:15 IST