Join us  

नगरसेवकाच्या इमारतीतच अनधिकृत बांधकाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 2:24 AM

अनधिकृत बांधकाम रोखण्याची जबाबदारी असणारे लोकप्रतिनिधीच अनेकदा अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे करत असल्याचे आढळून येते.

मुंंबई : अनधिकृत बांधकाम रोखण्याची जबाबदारी असणारे लोकप्रतिनिधीच अनेकदा अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे करत असल्याचे आढळून येते. ताडदेव परिसरातील वॉर्ड क्रमांक २१५ च्या नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांच्या सोसायटीतच अनधिकृत बांधकाम करून मोकळ्या जागेवर कब्जा केल्याचा प्रकार माहिती अधिकारातून उघडकीस आला. विशेष म्हणजे अनधिकृत बांधकाम हटविण्याची जबाबदारी असणाऱ्या पालिका प्रशासनाने वारंवार तक्रार दाखल करूनही दुर्लक्ष करण्याची भूमिका स्वीकारली आहे.माजी नगरसेवक आणि बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अरविंद दुधवडकर आणि आजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांचे ताडदेव येथील दीपक अपार्टमेंट, सुपारीवाला इमारतीत घर आहे. ताडदेव टॉवरजवळील व्हॅलेंटाइन स्पोर्ट्स क्लबला लागून असलेल्या याच सोसायटीत कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे एका घराचे बांधकाम करण्यात आले आहे. क्लबच्या मोकळ्या मैदानावरील संरक्षक भिंतीवर अतिक्रमण करत बांधकाम केले आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम अनधिकृत असल्याचे खुद्द अरविंद दुधवडकर यांनी मान्य केले आहे. या ठिकाणी सोसायटीच्या सुरक्षारक्षकांसाठी बांधकाम करण्यात आल्याचे दुधवडकर यांनी सांगितले. मात्र, हे बांधकाम दुधवडकर यांचेच असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते संजय दुबे यांनी केला आहे.या बांधकामाबाबत माहिती अधिकाराखाली विचारणा केली असता पालिका प्रशासनाने याबाबत माहितीच उपलब्ध नसल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली. ३ मार्च २०१८ रोजी सर्वप्रथम याबाबत पालिकेकडे माहिती मागविली होती. यावर सदर बाब संबंधित नसल्याचे सांगत उत्तर देण्यास टाळण्यात आले. यानंतर या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्याची मागणी करणारी तक्रार पालिका आयुक्त, संबंधित साहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांकडे करण्यात आली. त्यावर संबंधित तक्रारीची शहानिशा चौकशी आणि कारवाई करून अहवाल देण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिल्याचे उत्तर पालिकेकडून देण्यात आले. प्रत्यक्षात दुधवडकर यांच्या अनधिकृत बांधकामावर कसलीच कारवाई करण्यात आली नाही.वरिष्ठ अधिकाºयांनी दिलेल्या चौकशी आदेशाचे पालन झाले का? काय कारवाई करण्यात आली याबाबत माहिती अधिकारात माहिती मागविण्यात आली. यावर डी वॉर्ड विभागाने अशी कोणती माहितीच उपलब्ध नसल्याचे उत्तर देत विषयाला बगल दिली.>प्रशासनाची कृपा?उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरसेवकांनी अनधिकृत बांधकाम केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते. ताडदेव येथील या अतिक्रमणाबाबत मात्र पालिका प्रशासनाने डोळेझाक करण्याचे धोरण स्वीकारले आहे. आजी आणि माजी नगरसेवक असलेल्या नेत्यांनी पालिका प्रशासनाच्या कृपेने मुंबईतील मोकळ्या जागेवर अतिक्रमण केल्याचा हा प्रकार संतापजनक असून यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी संजय दुबे यांनी केली आहे.>‘सुरक्षारक्षकासाठी निवारा’याबाबत दुधवडकर यांच्याशी संपर्क साधला असता हे बांधकाम अनधिकृत असल्याचे मान्य केले. सोसायटीच्या सुरक्षारक्षकांच्या निवाºयासाठी दहा बाय दहाची खोली उभारली आहे. पालिकेने नोटीस देऊन ती तोडावी, असे माजी नगरसेवक अरविंद दुधवडकर यांनी सांगितले. आपण स्वत: सोसायटीत भाड्याने राहत असल्याचाही त्यांनी दावा केला.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका